भाजपचं राज्यपालांना पत्र

December 24, 2013 5:28 PM0 commentsViews: 256

Image img_193912_adarsh_240x180.jpg24 डिसेंबर :आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने आज राज्यपालांकडे केलीय.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. पण, राज्यपालांनी ती नाकारली. त्यानंतर आज विनोद तावडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून फेरविचार करावा, अशी मागणी केली.

 

close