इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी अमित शहांना दिलासा

December 24, 2013 6:50 PM0 commentsViews: 120

08_amit_2_1421120g24 डिसेंबर : इशरत जहाँ बनावट चकमकीप्रकरणी गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र तयार केलं आहे. पण, त्यात अमित शहा यांना क्लीन चिट देण्यात आल्याचं समजतंय. शहा यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्याचं नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुप्तचर विभागाचे अधिकारी राजींदर कुमार या कटात सामील असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या बनावट चकमकीची योजना आखणं आणि ती पूर्ण करणं, या संपूर्ण प्रक्रियेत राजींदर यांचा मोठा वाटा होता. गुजरात पोलिसांच्या मदतीनं त्यांनी ही चकमक घडवल्याचं या पुरवणी आरोपपत्रात म्हटल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. ठाणे जिल्हातील मुंब्रा येथे राहणारी इशरत ही तरुणी लष्कर-ए-तोयबाची अतिरेकी नव्हती आणि ती चकमकही बनावट असल्याचं सीबीआयच्या या पुरवणी आरोपपत्रात म्हटल्याचं समजतंय.

close