कसाबला भेटायचंय त्याच्या आईवडिलांना

February 17, 2009 6:33 PM0 commentsViews: 5

18 फेब्रुवारी, मुंबई मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबनं आईवडलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समजतंय. मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांकडं त्याने ही मागणी केलीय. पाकिस्ताननं त्याला आपला नागरिक म्हणून कबूल केल्याची माहिती पोलिसांनी त्याला दिली. त्यावर आपल्या आईवडिलांना लवकरात लवकर आपल्यासमोर आणावं, अशी मागणी त्याने केली. पाक सरकार आपला सर्व राग त्याच्या आईवडलांवरच काढत असेल, अशी कसाबला भीती आहे. दरम्यान मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्ताननं आणखी एका आरोपीला अटक केलीय. त्याचं नाव नजीर अहमद आहे. तो जमात-उद-दावाचा रावळपिंडी विभागाचा प्रमुख असल्याचं समजतंय. तो रिटायर्ड कर्नल असून त्याला चकालामधून अटक करण्यात आलीय. अटक करण्यापूर्वी त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती मिळालीय. नजीर अहमदलाही आता पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या ताब्यात दिलं जाणार आहे. सध्या सहा अतिरेकी एफआयएच्या रिमांडमध्ये आहेत.

close