प्रदेश काँग्रेसमध्ये होणार फेरबदल?

December 24, 2013 7:32 PM0 commentsViews: 471

Image manikrao_on_pawr_300x255.jpg24 डिसेंबर : प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाच्या घडामोडींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं पद जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे आणि बाळासाहेब थोरात यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे दिल्लीत आहेत. त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. तसंच केंद्रातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली.

close