‘आदर्श’वरून राहुल गांधी नाराज

December 24, 2013 9:39 PM0 commentsViews: 708

rahul team24 डिसेंबर :आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल राज्य सरकारनं फेटाळला. यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नाराज असल्याचं समजतंय. विश्वसनीय सूत्रांनी दिली आयबीएन लोकमतला ही माहिती दिली. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मिलिंद देवरांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

आदर्श आयोगाच्या अहवालात काही प्रश्नं उपस्थित करण्यात आले असतील तर त्यांची उत्तरं दिली पाहिजेत, असं ट्विट त्यांनी केलंय. यापूर्वी दोषी लोकप्रतिनिधींसंबंधी सरकारनं काढलेल्या वटहुकुमाविरोधात मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्याविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आदर्शचा अहवाल फेटाळल्याच्या दुसर्‍या दिवशी राहुल गांधी यांनी फिक्कीच्या कार्यक्रमात भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यावर रविवारी नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली होती. त्यामुळेच देवरा यांच्या आदर्शबाबतच्या ट्विटचं नेमकं काय कारण असा प्रश्न उपस्थित होतोय.

close