विमान कोसळून, पायलटचा अपघाती मृत्यू

December 25, 2013 1:53 PM0 commentsViews: 270

plane25 डिसेंबर : गोंदियातील राजीव गांधी राष्ट्रीय एअरक्राफ्ट ऍकॅडमीचं विमान मध्य प्रदेशातील पंचमढी जिल्ह्यात कोसळलं आहे. यात असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पायलटचा या अपघातात मृत्यू झालाय. सोहेल अन्सारी असं या पायलटच नाव आहे.

गोंदीयातल्या राजीव गांधी राष्ट्रीय एअरक्राफ्ट ऍकॅडमीच्या विमानताळावरून काल मंगळवारी या विमानाने उड्डाण केल्यानंतर ते हरवले होते. उड्डाणाच्या काही वेळातच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. बुधवारी सकाळी मध्य प्रदेशमधील पंचमढी जिल्ह्यातील बेलाखाटी गावात या हरवलेल्या विमानाचे अवशेष सापडले. प्रशिक्षणासाठी या विमानाचा वापर केला जायचा.

close