मुंबई हल्ल्याची सरकारला पूर्वकल्पना – लालकृष्ण अडवणी

February 17, 2009 6:45 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी, दिल्ली सरकारला मुंबई हल्ल्याची पूर्वकल्पना होती. तरीसुद्धा हल्ला रोखायला सरकार अपयशी ठरलं, असा आरोप भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलाय. ते आज लोकसभेत बोलत होते. 26/11 चा कट रचला जातोय आणि अतिरेकी समुद्रमार्गानं येणार हे सरकारला किमान वर्षभरापूर्वी समजलं होतं, असा दावा अडवाणी यांनी केला. त्यासाठी अडवाणी यांनी सध्या मुबंई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फहीम अन्सारीच्या चौकशीचा संदर्भ दिला. अडवाणी यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. स्थानिकांच्या सहभागाशिवाय असा हल्ला शक्य नसल्याचं अडवाणी म्हणाले. या हल्लाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. अडवाणींच्या या मागणीवर काँग्रेसने टीका केलीय. भाजप बेजबाबदारपणे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय.

close