आता बदलीच्या अधिकाराविरोधात अण्णांचा आंदोलनाचा एल्गार

December 25, 2013 5:42 PM0 commentsViews: 517

Image img_234312_annahazare43434_240x180.jpg25 डिसेंबर : संसदेनं लोकपाल विधेयक मंजूर केल्यानंतर अण्णा हजारे आता नवं जनआंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. शासकीय अधिकार्‍यांच्या बदलांचे अधिकार मंत्र्यांना दिले तर आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णांनी राज्य सरकारला दिला आहे. या मुद्द्यावर अण्णांनी यापूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर कोणत्याही सरकारी अधिकार्‍याची एखाद्या ठिकाणावरून 3 वर्षांपूर्वी बदली करता येणार नाही. तसेच 3 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणत्याच अधिकार्‍याला एखाद्या ठिकाणी ठेवता येणार नाही, असा कायदा राज्य सरकारने केला. मात्र हा कायदा बदलण्याचा घाट काही मंत्री घालत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

close