लष्करी अधिकार्‍यांवर कारवाई

December 25, 2013 5:51 PM0 commentsViews: 231

jammu terrsit ded25 डिसेंबर :  जम्मू आणि काश्मिरमधील मच्छिल बनावट चकमकीप्रकरणी दोन लष्करी अधिकारी आणि 4 जवानांविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. येत्या काही आठवड्यातच ही कारवाई सुरू होईल.

लष्करात नोकरी देतो असं आमिष दाखवून 2010मध्ये तीन तरुणांना नियंत्रणरेषेवर मच्छिल भागात बनावट चकमकीत ठार करण्यात आलं होतं. ठार झालेले तिघे पाकिस्तानी अतिरेकी असल्याचा दावा सुरुवातीला लष्कराने केला होता. पण, स्थानिकांनी केलेल्या आंदोलनामुळे दबाव वाढल्यावर या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. या चौकशीमध्ये ते तीन तरुण जम्मू आणि काश्मिरचेच रहाणारे असल्याचं स्पष्ट झालं होतं.

या घटनेनंतर एक कर्नल आणि एका मेजरला निलंबित करण्यात आलं होतं आणि आता पुढची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

close