सोलापुरात सीमीचे 2 संशयित अटकेत

December 25, 2013 4:07 PM0 commentsViews: 232

terrorist25 डिसेंबर : पुणे एटीएसच्या टीमने सोलापुरात धडक कारवाई करत सिमीच्या 2 संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आल्याचं पुणे एटीएसचे प्रमुख रेड्डी यांनी सांगितलं.

मध्य प्रदेशातून तुरुंग फोडून पळालेल्या सीमीच्या सदस्यांपैकी डॉ. अबू फसल आणि त्यांच्या साथीदारांना मध्य प्रदेशात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुणे एटीएसनं काल सोलापुरात महम्मद सादिक आणि उमर नावाच्या दोघांना स्फोटकांसह ताब्यात घेतलं.

close