एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची बंदी

February 18, 2009 5:11 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी निवडणूक आयोगानं सर्व ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवर निर्बंध घातलेत. मतदानाचा एकच टप्पा असलेल्या निवडणुकीत 48 तास आधी ओपिनियन पोल जाहीर करता येणार नाहीत. तसंच अनेक टप्प्यातल्या निवडणुकी दरम्यानही ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल जाहीर करता येणार नाहीत. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतरच एक्झिट पोल जाहीर केले जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगानं हे निर्बंध जाहीर केलेत.

close