मोदींविरोधात पुरेसे पुरावे- जाफरी

December 26, 2013 2:45 PM0 commentsViews: 310

26 डिसेंबर : गुजरातमध्ये 2002 च्या जातीय दंगल प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह 58 जणांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात एहसान यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज दुपारी 3च्या सुमारास अहमदाबादच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात 2002 साली गुजरात मध्ये झालेल्या दंगलीत नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काही गुन्ह्याची केस नोंदवता येणार की नाही यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

एसआयटीने आपल्या तपासात मोदीं यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले होते, पण याचा विरोध करत मोदींसहित इतर पोलीस अधिकारी आणि राजकारण्याविरोधात पुरेसा पुरावे असून ते दूर्लक्षीत करण्यात आलं असल्याचा आरोप करत, झाकीया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती.

कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांना 2002 च्या जातीय दंगलींमध्ये जीव गमवावा लागला. या गुलमर्ग सोसायटी हत्याकांडाला नरेंद्र मोदी जबाबदार असून राज्यभर पसरलेल्या दंगलीमधील वादग्रस्त भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी झाकीया जाफरी यांनी केली आहे.

‘गोध्रा इथे रेल्वेला लागलेल्या आगीनंतर नरेंद्र मोदी यांनी पोलीस अधिकार्‍यांनी हिंदूंना मुस्लिमांवरचा राग व्यक्त करू द्यावा, असे आदेश दिले होते. संजीव भट यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रात या आरोपाला पुष्टी दिलीय. मोदींच्या प्रक्षोभक भाषणांमुळे दोन समुदायांमध्ये तढे निर्माण झाला होते. मंत्र्यांनी पोलीस कंट्रोल रुममध्ये बसून पोलिसांच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप केला’ असल्याचा आरोप झाकीया जाफरी केला आहे.

सप्टेंबर 2011 मधल्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार एसआयटीनं मॅजेस्टेरिअल कोर्टात फेब्रुवारी 2012मध्ये क्लोदर रिपोर्ट सादर केला होता. त्यावर 28 ऑक्टोबर सुनावण्यात येणार होता मात्र त्यानंतर ही सुनावणी आधी 2 डिसेंबरपर्यंत आणि नंतर 26 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणार्‍या मोदींबाबत अहमदाबादच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे.

close