महिलेवर ‘पाळत’ प्रकरणी सरकार नेमणार चौकशी आयोग

December 26, 2013 4:35 PM1 commentViews: 344

Image modi_2nd_day.jpgfghgf_300x255.jpg26 डिसेंबर : गुजरातमध्ये एका महिलेवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. गुजरात सरकारच्या आदेशावरून एका महिलेवर पाळत ठेवली गेली, या आरोपाची चौकशी ही समिती करणार आहे. हा निर्णय संघराज्य पद्धतीस मारक असून राजकीय सूडबुद्धीने घेतला असल्याची टीका भाजपने केली आहे.

या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने तयार केला होता. या प्रस्तावास आजच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. ही चौकशी समिती पुढील तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास हा अहवाल सादर होऊ शकेल. सर्व अधिकृत कागदपत्रांची तपासणी करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे अधिकार या चौकशी समितीला आहेत.

  • Sandip Bhoi

    कॉंग्रेसला आता एव्हडेच काम राहिले आहे. भारताचया घृह खात्याकदे आता एव्हडेच काम आहे की एका महिले वर पालत ठेवली ते शोधा. या पेक्षा अज़ून कुठला प्रश्न नाही …….. खरच……. विनाश काले विपरीत बुद्धी.

close