जातीय दंगल : नरेंद्र मोदी यांना दिलासा

December 26, 2013 5:57 PM0 commentsViews: 511

Image img_225542_modionpm_240x180.jpg26 डिसेंबर :गुजरातमध्ये 2002 च्या जातीय दंगल प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अहमदाबाद मॅजिस्ट्रेट कोर्टाने क्लीन चिट दिलीये.

एहसान जाफरी हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने क्लोजर रिपोर्ट दिला होता. त्यानुसार नरेंद्र मोदी यांच्यासह 58 जणांना ‘क्लिन चीट’ देण्यात आली होती. पण या निर्णयाविरोधात एहसान यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका अहमदाबाद मॅजिस्ट्रेट कोर्टाने आज फेटाळलीये. कोर्टाच्या या निकालामुळे निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदींना मोठा दिलासा मिळालाय.

या आधी एसआयटीने आपल्या तपासात मोदीं यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगितले होते, पण याचा विरोध करत मोदींसहित इतर पोलीस अधिकारी आणि राजकारण्याविरोधात पुरेसा पुरावे असून ते दूर्लक्षीत करण्यात आलं असल्याचा आरोप करत, झाकीया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती.

कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांना 2002 च्या जातीय दंगलींमध्ये जीव गमवावा लागला. या गुलमर्ग सोसायटी हत्याकांडाला नरेंद्र मोदी जबाबदार असून राज्यभर पसरलेल्या दंगलीमधील वादग्रस्त भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी झाकीया जाफरी यांनी केली आहे.

सप्टेंबर 2011 मधल्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार एसआयटीनं मॅजेस्टेरिअल कोर्टात फेब्रुवारी 2012मध्ये क्लोदर रिपोर्ट सादर केला होता. त्यावर 28 ऑक्टोबर सुनावण्यात येणार होता मात्र त्यानंतर ही सुनावणी आधी 2 डिसेंबरपर्यंत आणि नंतर 26 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

close