संजय दत्तच्या घराबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची नारेबाजी

December 26, 2013 3:19 PM1 commentViews: 582

sanjay dutt and manyata26 डिसेंबर :  अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर महिन्याभरासाठी सुटका झाल्यामुळे, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (एबीवीपी)च्या कार्यकर्त्यांनी त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्याबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘संजय दत्त तु ने क्या किया? देश का नाम बदनाम किया’ अशी जोरदार नारेबाजी एबीव्हीपी कार्य़कर्त्यांनी केली.

पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून संजय दत्तने सुट्टीचा अर्ज केला होता. यावर त्याला ३० दिवसांची सुटी म्हणजेच पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका झाली होती. त्यातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर काय झाले, हे कळण्याआधीच संजय दत्त तुरुंगाबाहेर पडला. सध्या संजय दत्त त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी आहे.

  • Sandip Bhoi

    वाह रे माझ्या भारत देशा आणि वाह रे इथली लोकशाही. सरहद वरच्या सैनिकाला आणि कुठल्या कार्यालायतिल कर्मचारयाला पण एवहदया सट्टया मिलनार नाही तेव्हद्या सुट्ट्या इथे टाडा अंतर्गत शिक्षा सुनावलेल्या कैद्याला मिळतात.

close