10 जानेवारीपूर्वीच मराठा आरक्षण

December 26, 2013 1:18 PM0 commentsViews: 172

Image img_234022_naryanrane45_240x180.jpg26 डिसेंबर : मराठा आरक्षणप्रकरणी नारायण राणे समितीचा अहवाल 10 जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी याविषयीची माहिती दिली. पण शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी 10 जानेवारीपर्यंत अहवाल येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. या मुद्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिण्यात आला आहे.

गेल्या 15 वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होतेय. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची काही नेत्यांची मागणी आहे. मात्र याला ओबीसींचा विरोध आहे. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली असेलेल्या समितीनं जिल्हास्तरीय बैठका घेऊण अभ्यास केलाय. सध्या शासकीय-निमशासकीय कार्यालयं तसंच विद्यापीठं यात मराठा समाजाचं किती प्रमाण आहे, याचं सर्वेक्षण सुरू आहे. चार राज्यांतल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

close