सीएसटी स्थानकावर महिलेने स्वत:ला जाळून घेतले

December 26, 2013 3:19 PM0 commentsViews: 464

Image img_37542_cstfiring_240x180.jpg26 डिसेंबर : मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर महिला स्वच्छतागृहात एका महिलेने दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वत:ला आग लावून, जाळून घेतले आहे. हि महिला 90 टक्के भाजल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. डीआरएम ऑफिसजवळच्या शौचालयात ही घटना घडली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱयांनी दिली आहे.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील चौकशी सूरू आहे. या महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. सीएसटी स्थानकावरील महिला स्वच्छता गृहात या महिलेने आग लावून घेतल्याचे स्थानकावरच गोंधळ उडाला. उपस्थितांपैकी काहींनी आग विझविण्याचाही प्रयत्न केला परंतु, महिलेला वाचविण्यात अपयश आले आणि तिचा मृत्यू झाला.

close