मुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर पाय ठेऊ देणार नाही- मराठा संघटना

February 18, 2009 5:44 AM0 commentsViews: 10

18 फेब्रुवारी जुन्नररायचंद शिंदेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना आता आक्रमक होऊ लागल्या आहेत. सरकारनं लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या संघटनांनी दिलाय.किल्ले शिवनेरीवर 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सवासाठी मुख्यमंत्र्यांसह इतर सहा मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरीवर मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. पण सरकारच्या सुरक्षेचं कवच भेदून जाण्याचा इरादा आंदोलकांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय सध्या चांगलाच गाजतोय. राज्यातलं राजकारण सध्या या विषयामुळे ढवळून निघालंय. या वादाची सावली यंदाच्या शिवजयंती उत्सवावरही पडणार असं दिसतंय.

close