लोकसभेच्या उमेदवारीचा गांगुलीकडून इन्कार

February 18, 2009 6:41 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारीक्रिकेटमधून रिटायर्ड झालेल्या सौरव गांगुलीनं निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुलीला समाजवादी पक्षानं लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा होती. पण स्वत: गांगुलीनं मात्र ही अफवा असल्याचं म्हटलंय.येत्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणात क्रिकेटर्सना चांगली मागणी आहे.भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीननं गेल्याच आठवड्यात काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला आहे. क्रिकेटच्या मैदानावरचे बाऊंसर्स सहज खेळणारा अझर आता राजकारणात आपले पाय कसे रोवतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे.नवज्योत सिंग सिद्धूने क्रिकेटनंतर राजकारणातही आपला ठसा ब-यापैकी उमटवलाय. सिद्धूने गेल्या दोन निवडणुका जवळजवळ 1 लाखाच्या फरकाने जिंकल्या आहेत. आता जे सिद्धूने अमृतसरमध्ये कमवलं ते अझर हैदराबादमध्ये मिळवू शकतो का? अझरूद्दीनवर मॅच फिक्सिंगचा आरोप सिद्ध झाल्यामुळे क्रिकेटमध्ये आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आणि याच मुद्द्याचा वापर अझरचे प्रतिस्पर्धी निवडणुकीत करतील हे नक्की. पण अझरच्या क्रिकेट करिअरपेक्षा त्याच्या सामाजीक कार्यावरूनच लोक त्याची निवड करतील असं अनेकांना वाटतं.

close