हसन मुश्रीफांना दुधानं अभिषेक

December 27, 2013 2:51 PM0 commentsViews: 745

husen mushraf27 डिसेंबर :  कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अंगावर काल बुलडाण्यामध्ये शाई ओतण्यात आली होती. या घटनेचा कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. कोल्हापूरमध्ये आज हसन मुश्रीफ यांना कार्यकर्त्यांनी दुधानं अभिषेक घातला. आपले मंत्री कामं करतात, असं सांगत कार्यकर्त्यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला.

 
दरम्यान, आज मुश्रीफ यांच्या गावात म्हणजेच कागलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तर करवीर आणि कागल तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.

close