नवी मुंबईकरांना मिळणार सिटीझन आयकार्ड

February 18, 2009 8:16 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी नवी मुंबईविनय म्हात्रे नवी मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिकांना सिटीझन आयकार्ड देण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेकडून हे आयकार्ड तीन टप्प्यांत नवी मुंबईकरांना देण्यात येणार आहेत. या सिटीझन आयकार्डमुळे शहरातील गुन्हेगारी आणि बांग्लादेशमधून येणा-या लोंढ्यावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.देशात पहिल्यांदा दिल्ली शहरात सिटीझन आयकार्ड देण्याच ठरलं. पण ती योजना अंमलात येण्यापूर्वीच राजकारण घडलं आणि योजना बारगळली. आता नवी मुंबई महापालिकेनं ही योजना राबवण्याचं ठरवलं आहे. गुजरात बॉम्बस्फोटाचे नवी मुंबईशी धागे जोडले गेले होते.नवी मुंबईतूनच ई-मेल करण्यात आला होता. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या गाड्याही नवी मुंबईतूनच चोरल्या गेल्या होत्या. तसंच वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात ठेवण्यात आलेला बॉम्ब. या सर्व घटना पाहिल्यावर, नवी मुंबई आता हॉटसिटी म्हणून ओळखली जातेय.दिल्ली प्रमाणेच नवी मुंबईतही या सिटीझन आयकार्डच राजकारण होऊ नये, यासाठी प्रस्तावाला मंजूरी देण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यात आलंय. नवी मंुबई महापालिका तीन टप्प्यात ही योजना पूर्ण करणार आहे. चालू वर्षात या योजनेकरिता एक करोडची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या सर्वच थरातून या योजनेचा स्वागत होत आहे.स्थायी समितीचे सभापती संदीप नाईक म्हणाले, तीन टप्प्यातमध्ये ही योजना पूर्ण केली.महापालिकेच्या या योजनेचा सर्वात जास्त स्वागत नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे. कारण त्यांंची डोकेदुखी कमी होणार आहे. याबाबत डी.सी.पी. एन.डी.चव्हाण म्हणाले, या योजनेसाठी पालिकेला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. याचा फायदा पोलिसांना जास्त होणार आहे.नवी मुंबई महापालिकेन या योजनेचा सर्व्हे सुरू केलाय. पल्स पोलिओच्या सर्व्हेप्रमाणे हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यामुळे या वर्षाअखेरीस तरी सिटीझन आयकार्ड मिळावं, अशी आशा नवी मुंबईकर बाळगून आहेत.

close