रामलिंग राजू परिवाराच्या इतर कंपन्यांचीही चौकशी

February 18, 2009 8:30 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीसत्यम महाघोटाळ्यानंतर सरकारनं आता रामलिंग राजू आणि त्यांच्या परिवाराच्या इतर कंपन्यांकडेही मोर्चा वळवला आहे. रामलिंग राजूनं सत्यममधला पैसा कुठे वळता केला याचा शोध घेण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.मेताज कंपनी सत्यमच्या रामलिंग राजूची एक कंपनी. या कंपनीच्या चौकशीतून सत्यम घोटाळ्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सरकारनं आता कंपनी लॉ बोर्डकडे अर्ज करून मेटाज इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेताज प्रॉपर्टीज या कंपन्यांचे बोर्ड भंग करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही मेटाज कंपन्यांचे सध्या काही मोठे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यात हैदराबाद मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचाही समावेश आहे. तर मेटाज प्रॉपर्टीचे काही रहिवासी बिल्डिंग प्रोजेक्टसही सुरू आहेत. या सर्व घडामोडींमुळे हे प्रोजेक्ट्स रखडणार आहेत किंवा त्यांना उशीर तरी होणार आहे. सरकारनं सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसतर्फे होत असलेल्या चौकशीत आता सत्यम बरोबर मेटाजच्या दोन्ही कंपन्यांचीही चौकशी सुरू केली आहे.आता सरकारच्या या अर्जावर कंपनी लॉ बोर्डाची 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

close