‘बर्निग ट्रेन’, 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

December 28, 2013 3:17 PM0 commentsViews: 739

burning train28 डिसेंबर :  आंधप्रदेशच्या पुट्टपर्थीजवळ आज पहाटे सव्वा तीन वाजता नांदेड – बंगळुरू एक्स्प्रेसच्या एसी कोचला लागलेल्या आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बंगळुरूहून नांदेडला जाणर्‍या या एक्सप्रेसच्या एसी डब्याला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास पुट्टपर्थीजवळ आग लागली. त्यावेळी बोगीमध्ये एकूण 54 प्रवासी होते. आग लागल्यानंतर काही प्रनाशांनी साखळी ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी जीव वाचवण्यासाठी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. आगीचे नक्की कारण अद्याप समजले नसून एसी यंत्रणेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बंगळुरूहून नांदेडला जाणरी ही एक्स्प्रेस रात्री पावणे अकरा वाजता निघाली होती. आज पहाटे सव्वा तीनच्या सुमारास बी-1 या एसी बोगीमध्ये आग लागली.  मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने 5 लाखांच्या मदतीची घोषणा केलीय. गंभीर जखमींना 1 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेशही रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेत.

 

close