पुण्यात अजूनही भाडे कपातीबाबत निर्णय नाही

February 18, 2009 9:22 AM0 commentsViews: 20

18 फेब्रुवारी पुणेनितीन चौधरीपुण्यात शहर बस वाहतूक आणि रिक्षा भाडे कपातीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली. तसंच रिक्षा भाडे कपातीचे आदेश परिवहन मंत्रालयाने काढले आहेत. तरी पुण्यात बस आणि रिक्षा वाहतुकीचे भाडे कमी झालेलं नाही. पीएमपीचा अल्प भाडे कपातीचा प्रस्ताव आहे पण प्रवासी संघटनांचा त्याला विरोध आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीनंतर पुण्यातल्या रिक्षा आणि शहर बस भाड्यात कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं दिला होता. त्यानुसार मुंबईत रिक्षा भाडे कपातीचा निर्णय झाला असल्यामुळे आता पीएमपीनं भाडे कपातीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करणं अपेक्षित होतं. याबाबत महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पण बैठक संपल्यानंतरही पीएमपीचा प्रस्ताव आला नाही. पीएमपीचे अध्यक्ष नितीन खाडे सांगतात, प्रवाशांचा विचार करून भाडे कपात करावी लागेल पण त्यासोबतच कंपनीची आर्थिक स्थिती कशी सुधारेल याकडेही लक्ष द्यावं लागेल.पीएमपीनं दिलेला भाडे कपातीचा प्रस्ताव अत्यल्प असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचानं केला आहे. याबाबत प्राधिकरणाकडं दाद मागणार असल्याचं मंचाचे निमंत्रक विवेक वेलणकर यांनी सांगितलं आहे. वेलणकरांच्यानुसार मुळात पीएमपीनं सप्टेंबरपूवीच्या भाड्याचे दर लागू करावे. सद्याची ही भाडे कपात अत्यल्प आहे. अतिशय घाईघाईत हा निर्णय घेतलेला आहे. पासेसच्या किमती सुद्धा पूर्णपणे कमी केलेल्या नाहीत. जेष्ठ नागरिकांची ओरड आहे. ही भाडे कपात पूर्णपणे मागे घ्यावी याबाबत प्रवासी मंच आता आरटीएकडे मागणी करणार आहेत.

close