‘तिजोरीच्या चाव्या’ केजरीवालांकडे !

December 28, 2013 4:40 PM0 commentsViews: 1984

cm kejrival delhi28 डिसेंबर : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर सहा मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा संपल्यानंतर केजरीवाल यांनी खातेवाटप जाहीर केलंय. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्याकडे गृह, ऊर्जा, नियोजन, दक्षता आणि तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खाते ठेवले आहे.

तर आम आदमीचे प्रमुख नेते आणि पत्रकार मनिष सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, शहर विकास खाते देण्यात आले आहे. तर राखी बिर्ला यांच्याकडे महिला बालकल्याण आणि सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे. तसंच सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य आणि पर्यावरण खाते, सोमनाथ भारती यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण खाते देण्यात आले आहे. शपथविधी होण्याअगोदरच खातेवाटपावरुन मोठा वाद झाला होता. मात्र हा वाद ‘आप’च्या नेत्यांनी वेळीच ‘साफ’ केला त्यामुळे शपथविधीपूर्वी उठलेलं वादळ शमलं आणि आज सोहळा यशस्वीपणे पार पडला.

 

‘आप’चं मंत्रिमंडळ

अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री
खाती – गृह, ऊर्जा, अर्थ, नियोजन आणि दक्षता.

 • - आयआयटी खरगपूरचे मेकॅनिकल इंजिनियर
 • - इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये अधिकारी होते
 • - ‘परिवर्तन’ संस्था स्थापन करून गोरगरिबांची मदत
 • - ‘उदयोन्मुख नेतृत्व’ म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मान
 • - अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत महत्त्वाची भूमिका
 • - आम आदमी पार्टीचे संस्थापक

मनीष सिसोदिया
खाती – शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, शहर विकास

 • - भाजपच्या नकुल भारद्वाज यांना 11,476 मतांनी हरवलं
 • - आधी पत्रकार, नंतर आरटीआय कार्यकर्ते
 • - ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे सह-संस्थापक
 • - ‘आप’ची धोरणं ठरवण्यात मोठा वाटा
 • - ‘आप’चं मीडिया धोरण ठरवतात

सोमनाथ भारती
खाती – पर्यटन, कायदा आणि प्रशासकीय सुधारणा

 • - भाजपच्या आरती मेहरा आणि काँग्रेसच्या किरण वालियांचा पराभव
 • - आयआयटी ग्रॅज्युएट आणि वकील
 • - ‘लोकपाल’च्या मोहिमेत सक्रिय सहभाग
 • - दिल्ली बलात्काराचा निषेध करणार्‍या तरुणांचे वकील

राखी बिर्ला
खाती – महिला बालकल्याण, सामाजिक न्याय

 • - काँग्रेसच्या राजकुमार चौहान यांचा 10,585 मतांनी पराभव केला
 • - आधी पत्रकार होत्या
 • - वाल्मिकी समाजासाठी काम केलं
 • - आपच्या कॅबिनेटमधल्या एकमेवर महिला सदस्य
 • - वय 26 वर्षं, आप कॅबिनेटमधल्या सर्वांत तरुण मंत्री

सौरभ भारद्वाज
खाती – अन्न पुरवठा, परिवहन

 • - भाजपच्या अजय कुमार मल्होत्रांचा 13,092 मतांनी पराभव
 • - शिक्षण: इंजिनियरिंग आणि कायदा

गिरीश सोनी
खाती – कामगार कल्याण, SC, ST कल्याण

 • - काँग्रेसच्या मालाराम गंगवाल यांचा 1,103 मतांनी पराभव केला
 • - शिक्षण : 12 वीनंतर ITI
 • - पेशाने व्यापारी
 • - ‘आप’च्या पाणी आणि वीज बिलविषयक आंदोलनात सहभाग

सत्येंद्र जैन
खाती – आरोग्य आणि पर्यावरण

 • - भाजपच्या शामलाल गर्ग यांचा 7000 मतांनी पराभव
 • - पेशाने आर्किटेक्ट
 • - खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे CPWD मधली नोकरी सोडली 
close