‘खाप’पंचायत, ‘ती’ला 62 वर्षाच्या वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती !

December 28, 2013 7:24 PM0 commentsViews: 523

jaat panchyat428 डिसेंबर : जातपंचायतीच्या अजब कारभाराचा फटका श्रीरामपूरच्या एका अल्पवयीन मुलीला बसतोय. 17 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीवर 62 वर्षांच्या वृद्धाशी संसार करण्याची सक्ती वैदू समाजाची जात पंचायत करतेय.

स्वत:च्याच मुलीचा बळी घेतल्याबद्दल ताया लोखंडे हा जन्मठेप भोगून आला आहे. त्याच्यासोबत नांदायला जाण्याची सक्ती या मुलीला जात पंचायतेनं केली आहे. 14 वर्षांपूर्वी ताया तुरुंगात असताना त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यावेळी तिच्या 4 वर्षांच्या लहान बहिणीसोबत लग्न करण्याचा आदेश जातपंचायतीने दिला होता.

आज ती मुलगी 17 वर्षांची झाली आहे. त्यामुळे 62 वर्षांच्या या तायासोबत तिनं किमान एका रात्रीसाठी तरी नांदायला जावं असं फर्मान वैदू समाजाच्या जातपंचायतीनं काढलंय. पीडित मुलीचे आजी-आजोबा गेल्या 15 वर्षांपासून जातपंचायतीच्या या आदेशाविरोधात लढत आहेत. पण पंचायत त्यांना दाद देत नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. पण जात पंचायतीच्या दबावामुळे पीडित कुटुंब पोलीस तक्रार करण्यास बिचकत आहेत.

close