मंगळवेढ्यात किडनी चोरांचं रॅकेट उघडकीस

February 18, 2009 8:23 AM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारीलहान मुलांना चॉकलेट खायला देऊन त्यांची किडनी चोरणा-या एका आंतरराज्य टोळीचा मंगळवेढा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात दोन संशयित आरोपींना अटक करून पोलिसांनी दोन मुलांची सुटका केली आहे. हणमंत हेगडे आणि धर्मा बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत.मंगळवेढा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. या दोघांनी मंगळवेढा तालुक्यातील सिद्धप्पा कोळी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणखी एका मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याच्या हेतूने लहान मुलांचे अपहरण करून त्यांची किडनी विकणारे हे रॅकेट महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती या तपासातून हाती येतेय.

close