कोल्हापुरात सेना-भाजपचं ‘जागो नगरसेवक जागो’आंदोलन

February 18, 2009 10:37 AM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी कोल्हापूरकोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक स्वार्थासाठी रस्ते विकास प्रकल्प होऊ देत नाहीत असा आरोप करत शिवसेना आणि भाजपनं 'जागो नगरसेवक जागो' हे आंदोलन केलं. पोलिसांच्या बंदोबंस्ताला न जुमानता हे आंदोलनकर्ते महापालिकेत घुसले आणि त्यांनी नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. काही दिवसांपूर्वी शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्ते विकास प्रकल्पाबाबत महानगरपालिका प्रशासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी केली होती. पण अद्याप श्वेतपत्रिका जाहीर केलेली नाही.आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे शिवसेना -भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागो नगरसेवक जागो हे अभिनव आंदोलन केलं.

close