31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकारांसाठी विशेष गाड्या

December 29, 2013 2:30 PM0 commentsViews: 214

Image img_76062_womenintrain_240x180.jpg29 डिसेंबर : 31 डिसेंबरला रात्री अगदी उशीरापर्यंत पार्टी करता यावी आणि नवीन वर्षाचं स्वागत करता यावं, यासाठी पश्चिम रेल्वेनं पुढाकार घेतला आहे. मध्यरात्री चर्चगेट ते विरार 4 आणि विरार ते चर्चगेट 4 अशा या आठ गाड्या चालवल्या जाणार आहेत. या सगळ्या गाड्या 12 डब्यांच्या असतील आणि त्या सगळ्या स्टेशनांवर थांबणार आहेत.

दरवर्षी गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंटच्या क्वीन्स नेकलेस या भागामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भरपूर गर्दी होते. हे लक्षात घेऊन यावर्षी पश्चिम रेल्वेनं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतलाय. तर 31 डिसेंबरसाठी मध्य रेल्वेच्याही सहा विशेष गाड्या असतील. या सर्व गाड्या बारा डब्यांच्या असतील. तर हार्बर लाईनवरूनही दोन गाड्या चालवण्यात येतील. या गाड्या नऊ डब्यांच्या असतील.

close