‘आप’चं वाढतं आकर्षण

December 29, 2013 4:02 PM0 commentsViews: 268

aap members29 डिसेंबर :आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील विजयानंतर समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा ओघ ‘आप’च्या बाजूने वाढू लागला आहे. दिल्लीच्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आक्रमकपणा, भ्रष्टाचाराविरूध्द त्यांनी पुकारलेला लढयामुळे देशातच नाही तर विदेशातही केजरीवाल आणि ‘आप’बद्दल आकर्षण वाढू लागले आहे.

माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी ‘ऍपल’या कंपनीमधली कोट्यवधी रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून ‘आप’ मध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त केलीय. आपल्याला कुठलीच महत्वाकांक्षा नसून देशातली सिस्टीम बदलली पाहिजे, असं आदर्श यांचं म्हणणं आहे. तर गोव्यातील प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस यांनीही ‘आप’ पक्षात प्रवेश केला आहे. नागपूरचे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आणि काँग्रेसचे माजी मंत्री वसंत साठे यांचे जावई डॉ. उदय बोधनकर यांनीही ‘आप’कडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

close