नाशिकच्या सुनीलची रेसिंग कार

December 29, 2013 7:46 PM0 commentsViews: 114

29 डिसेंबर :  नाशिकच्या निफाडमध्ये सध्या आकर्षणाचा विषय ठरलीय ती एका गॅरेजमध्ये काम करणार्‍या सुनिलची रेसींग कार. निफाड तालुक्यातल्या करंगावच्या सुनिलचं गॅरेज आहे. बरीच वर्ष गॅरेजमध्ये काम केल्यानंतर काहीतरी वेगळं करावं, असं सुनिलला वाटलं आणि त्यानं चक्क हेलीकॉप्टर बनवायला सुरुवात केली. पण त्यासाठी वेळही भरपूर जात होता आणि पैसाही. शेवटी त्यानं हेलीकॉप्टरचा प्रोजेक्ट थोडा बाजुला ठेवला आणि चक्क एक रेसींग कार बनवली. कोणतंही तांत्रिक प्रशिक्षण नसताना नेटवरून माहिती मिळवून सुनिलने ही कार बनवली आणि आता त्याचा निश्चय आहे तो हेलिकॉप्टर बनवण्याचा.

close