…मात्र विद्यार्थी सुखरूप

December 29, 2013 7:53 PM0 commentsViews: 94

29 डिसेंबर :दुर्घटनाग्रस्त नांदेड -बंगलोर एक्सप्रेस आज सकाळी नांदेडला पोहोचली. काल पहाटे या ट्रेनमध्ये एका बोगीला आग लागून 27जणांचा मृत्यु झाला होता. या गाडीने ज्ञान माता विद्यामंदिरचे 40 विद्यार्थी सहलीहून परत येत होते. त्यामुळे पालकांनी स्टेशनवर गर्दी केली होती. हे सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचं रेल्वे अधिकार्‍यांनी जाहीर केल्यानं उपस्थितांची डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आग लागलेल्या बोगीत नांदेडचे सात प्रवासी होते पण त्यांच्याशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

close