पुणे एटीसी करतंय मंचर एसटी स्फोटाचा तपास

February 18, 2009 8:03 AM0 commentsViews: 46

18 फेब्रुवारी पुणेपुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या एसटी डेपोत रविवारी स्फोट झाला. या स्फोटात दहशतवाद्यांचा हात आहे का याचा तपास ऍन्टी टेररिस्ट स्क्वाडचं पुणे युनिट करतंय. खेड – रांजणी या एसटी बसमध्ये रविवारी स्फोट झाला होता. जिलेटीन आणि डिटोनेटरचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आला होता. सोमवारी एटीएसचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथकाच्या दहा अधिका-यांनी मंचर एसटी डेपोला भेट दिली. स्फोटात वापरलेल्या वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. स्फोटात वापरलेल्या स्फोटकांवरून त्यातला दारूगोळा विदर्भातल्या एका ऑर्डनन्स फॅक्टरीतला आहे असं उघड झालं आहे. त्या दिशेनं एटीएसनं तपास सुरू केला आहे.

close