काँग्रेस देशावर ओझं-नरेंद्र मोदी

December 29, 2013 8:05 PM0 commentsViews: 227

29 डिसेंबर :  भाजपचे पंतप्रधानपदाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज रांचीमध्ये संकल्प रॅली घेतली होती. त्यात त्यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष हा आता देशावर ओझं झाला असल्याची टीका मोदी यांनी केली.

भ्रष्टाचार, महागाई याच्याशी सत्ताधारी काँग्रेसला काहीही देणघेणं नाही. काँग्रेस हा लोकांपासून दूर असलेला पक्ष असल्याची टीका मोदी यांनी केली.

त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबवण्याऐवजी काँग्रेसचे नेते केवळ ‘आकाशवाणी’ करातात अशा शब्दात नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

झारखंडमधील जनतेने लोकसभेच्या झारखंडमधील 14 जागांवर भाजपला विजयी करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

close