राहुलसमोर मोदी, केजरीवाल काहीच नाहीत – लालू

December 29, 2013 8:25 PM1 commentViews: 456
Image lalu_prasad_yadav_on_badget_300x255.jpg29 डिसेंबर : भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे काहीच नाहीत, असे मत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले आहे.
”मोदी आणि केजरीवाल यांच्या तुलनेत राहुल गांधी कितीतरी पुढे आहेत. दिल्लीतील नागरिकांनी आम आदमी पक्षाला निवडून देवून चूक केली आहे. पुढील महिनाभरातच दिल्लीतील नागरिकांना कळेल, की आपण निवडून दिलेले उमेदवार हे कसे आहेत.” असं मीडियाशी बोलताना लालूप्रसाद म्हणाले.
  • Sandip Bhoi

    Look who is talking…….. Sant mahatma…… Shameless.

close