मायकल शूमाकर कोमात

December 30, 2013 10:35 AM0 commentsViews: 826

115969394930 डिसेंबर :  सात वेळा जगज्जेता ठरलेला फॉर्म्युला वन रेसिंगचा स्टार मायकल शूमाकर स्कीईंग करताना झालेल्या अपघातामुळे कोमात गेलाय. स्कीईंग करताना खडकावर आपटल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो कोमात गेला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी फ्रान्समधेआल्प्समध्ये स्कीईंग करताना ही दुर्घटना घडली. अपघातानंतर त्याला लगेच हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण तो कोमात गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 14 वर्षांचा मुलगा आणि मित्रांसोबत स्कीईंग करताना शूमाकर खडकावर आदळला.

शुमाकरचा पुढच्या शुक्रवारी 45वा वाढदिवस आहे. शुमाकरने 2004साली शेवटची फॉर्म्युला वन रेस जिंकली होती , तर 2012मध्ये त्याने फॉर्म्युला वन रेसमधून निवृत्ती घेतली आहे.

close