संजय दत्तचा निवडणूक प्रचार सुरू

February 18, 2009 12:08 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी लखनौसुप्रीम कोर्टानं परवानगी देण्याच्या आधीच संजय दत्तनं आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी त्याचा लखनौमध्ये प्रचार सुरू झाला आहे. लखनौत प्रचार करताना संजयनं आपलं मूळ घरं शोधण्याचा प्रयत्न केला. फाळणीनंतर 1949 ते 1952 या काळात सुनील दत्त लखनौतल्या अमिनाबादमध्ये एका घरात राहिले होते.या काळात सुनील दत्त आकाशवाणी लखनौमध्ये काम करत होते.त्या घराचा शोध घेण्याचा प्रयत्न संजय दत्तनी केला. संजय दत्त येणार म्हणून अमिनाबादचे लोक खूपचं खूश होते. पण संजय आलाच नाही. सुरक्षेच्या कारणास्तव संजय दत्त आला नाही असं बोललं जातंय. त्यामुळे लोक खूपचं नाराज झाले. या प्रचार दौ-यादरम्यान संजय सपाच्या कार्यकर्त्यांना काही अधिका-यांना तसंच लखनौच्या डॉक्टरांना भेटणार आहे.

close