‘आदर्श’मध्ये 22 जणांचे बेनामी फ्लॅट !

December 30, 2013 3:22 PM1 commentViews: 554

30 डिसेंबर : वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणावरुन काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. मात्र ज्या अहवालावरुन वाद सुरु आहे त्यामध्ये 25 सदस्य अपात्र ठरवले गेले. तर 22 जणांचे फ्लॅट्स बेनामी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. अशा प्रकारे न्यायालयीन आयोगाने आदर्श सोसायटीतल्या एकूण 103 पैकी 47 फ्लॅट्सच्या मालकीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

आदर्श सोसायटीचा सगळाच व्यवहार हा गौडबंगाल असल्याचे आदर्शच्या न्यायालयीन आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यायालयीन आयोगाच्या अहवालानुसार आदर्शच्या 103 सदस्यांपैकी 25 सदस्य अपात्र आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय नेते आणि अधिकार्‍यांशी संबंधित मंडळी आहेत.

अपात्र सदस्य

 • बाबासाहेब कुपेकर, माजी विधानसभा अध्यक्ष/राष्ट्रवादी
 • सुरेश प्रभू, माजी खासदार, शिवसेना
 • आदित्य पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे पुतणे
 • अरूण ढवळे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांचे जावई
 • देवयानी खोब्रागडे, IFS, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांची मुलगी
 • शिवाजी काळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिफारस
 • माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिफारस
 • निवृत्ती भोसले, बिल्डर अविनाश भोसले यांचे वडील
 • भगवती शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सासू
 • मदनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे चुलत सासरे
 • सीमा शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मेव्हणाची पत्नी
 • गिरीश मेहता, (राजकारण्यांशी जवळचे संबंध)
 • रुपाली रावराणे, (सुपरलाईन कन्स्ट्रक्शनने पैसे दिले)

बहुतेक अपात्र सदस्यांना राजकारण्यांमुळे फ्लॅट मिळाल्याचा आरोप होतोय. या अहवालात आदर्श सोसायटीत तब्बल 22 फ्लॅट्स बेनामी ठरवले गेले आहेत. म्हणजेच ज्यांच्या नावावर फ्लॅट्स आहेत, त्यांच्यासाठी दुसर्‍यांनी कारण नसताना पैसे दिल्याचं सिद्ध झालंय. यामध्ये

 • - एस. व्ही. बर्वे, IPS अधिकारी संजय बर्वे यांच्या पत्नीने पैसे दिले
 • - धोंडीराव वाघमारे, माजी आमदार
 • - रुपाली रावराणे, (सुपरलाईन कन्स्ट्रक्शनने पैसे दिले)
 • - मुकुंदराव मानकर, नागपूरचे रहिवासी (त्रयस्थाकडून पैसे)
 • - रघुनाथ भोसले, कोल्हापूरचे रहिवासी (त्रयस्थाकडून पैसे)
 • - विश्वास चौघुले, कोल्हापूरचे रहिवासी (त्रयस्थाकडून पैसे) यांचा समावेश आहे

तर 9 फ्लॅटधारकांना फ्लॅट खरेदीसाठी भाजप खासदार अजय संचेती यांच्या फॅन फायनान्सनं पैसे दिलेत. यांची नावं आहेत.

अजय संचेतींच्या कंपनीनं पुरवले पैसे

 • - सुरेश आत्राम
 • - सुधाकर मडके
 • - राजेश बोरा
 • - जगदीश प्रसाद शर्मा
 • - परमानंद हिंदुजा
 • - मणिलाल ठाकूर
 • - पी. राम
 • - अमरजीत सिंग
 • - किरण भडांगे

यावरून आता राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. अशा पद्धतीने आदर्शचे इमले बनवेगिरीच्या पायावर उभारले गेल्याचं स्पष्ट होतंय.

 • Sandip Bhoi

  Shame…………..Shame…………..Shame…………..!!!!!!!

close