मुंबईत लोकल ट्रेनची मोठी दुर्घटना टळली

February 18, 2009 12:20 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी मुंबईमुंबईतल्या सीएसटी स्टेशनवर लोकल ट्रेनचा ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात होणार होता. पण सुदैवानं ही दुर्घटना टळलीय. मुंबईकडे येणारी कसारा लोकल सीएसटीमध्ये प्रवेश करत असताना अचानक दोन डब्यांच्या मधलं कप्लिंग तुटलं. आणि मोटरमनचा डबा आणि त्यामागचे 5, 6 डबे पुढे निघून गेले. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला पण गाडी स्टेशनात असल्यानं मोठी दुर्घटना टळली. या ट्रेनमधले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या दुर्घटनेचं नक्की कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही.

close