सिंधुदुर्गात तिलारी धरणाचा उजवा कालवा फुटला

December 30, 2013 3:56 PM0 commentsViews: 461

tilari dam30 डिसेंबर : सिंधुदुर्गात तिलारी धरणाचा उजवा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. या कालव्यातून महाराष्ट्राला पाणी मिळतं. कालवा फुटल्यामुळे सध्या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. याआधीसुद्धा तिलारी धरणाचा डावा कालवा फुटून शेतीचं मोठं नुकसान झालं होतं.

एकूणच तिलारी धरणाच्या दोन्ही कालव्यांचं बांधकाम निकृष्ट झाल्याचं उघड झालंय. 2009 साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं होतं. या धरण्याच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन 2007 मध्ये झालं.

पण डाव्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे याच वर्षी डावा कालवा फुटल्याचीही घटना घडली होती. ही घटना घडल्यानंतरही कोणतेही उपाय करण्यात आले नसल्याचं दिसतंय. त्यामुळे उजवा कालवा फुटल्याची घटना घडली आहे.

close