‘स्वाभिमानी’दुखावला, ‘आप’सोबत युती नाहीच !

December 30, 2013 6:00 PM2 commentsViews: 3676

raju shetty on aap30 डिसेंबर : आम्ही कुणाच्या दारात युती करण्यासाठी गेलो नव्हतो, आम्हाला मान-अपमानाचं नाट्य रंगवायचं नाही असं ठणकावून सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आम आदमी पार्टीसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिलाय. लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी आमचा प्रभाव आहे तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढणार असंही शेट्टींनी जाहीर केलं. तसंच गेली 15 वर्ष झाली आम्ही जनतेची प्रश्न घेऊन लढतोय. ‘आप’ला एक राज्यात सत्ता मिळाली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात उत्साह असेल किंवा तो अतिरेकही असू शकतो पण सत्तेपायी हुरळून जाऊ नये असा सल्लावजा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.

आम आदमी पार्टीने ‘दिल्ली’ जिंकल्यानंतर महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला. ‘आप’च्या नेत्यांनी राज्यात मोर्चेबांधणीला सुरूवातही केली. याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांसाठी लढा देणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युतीसाठी आज सोमवारी पुण्यात बैठक पार पडली. मात्र युती होण्यापूर्वीच बेबनाव झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकाच वेळी ‘आप’ आणि भाजपसोबत चर्चा सुरू आहे, असा दावा ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी केला.

‘आप’शी युती करणार असं भासवून स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत सीट डिलिंग करत नाहीत ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रस्ताव आला की, युतीबाबत चर्चा करू, असंही दमानिया यांनी स्पष्ट केलं. दमानिया यांच्या वक्तव्यामुळे आयबीएन लोकमतशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीये. आम्हाला आम आदमी पार्टीची गरज नाही, आम्हाला ग्रामीण भारतात चांगला बेस आहे, असं शेट्टी यांनी ठणकावून सांगत ‘आप’सोबत जाणार नाही असे संकेत दिले. दमानिया यांच्या विधानामुळे स्वाभिमानी सोबत युतीच्या चर्चेत ‘मिठाचा खडा’ पडला. अखेर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका कायम ठेवत आम्ही कुणाचा दारात युती करण्यासाठी गेलो नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त करत युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला.

‘स्वाभिमानी’च्या भुमिकेमुळे आम आदमीने पॅकअप केलंय. पण राजू शेट्टी यांच्या टीकेवर दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला स्वाभिमानी सोबत जाण्यास काहीही अडचण नाही. पण स्वाभिमानी भाजपसोबत जाणार असल्याचं कळल्यामुळे दुख झालं होतं. त्यामुळे आम्ही ‘स्वाभिमानी’च्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली. जर राजू शेट्टींना युती करण्याबाबत अडचण असेल तर आमचा मार्ग मोकळा आहे असं स्पष्टीकरण दमानियांनी दिलं.

  • pramod bachche

    AAP ani swabhimani donhi janatesathi ladhat ahet , doghanahi janatela changale diwas dakhawayache ahet mag vyakatigat or pakshwaadi rajakaran kashyasathi.. ekatr yeun seva kara.. its not about ego of individual its about walefare of people.. jar swabhimani BJP barobar yutichi characha karat nahiy mag tyani janatela tas sangaw..

  • pramod bachche

    vyaktigat ani pakshnihay rajakanamule rajyach nukasan… swabhimaani should rething

close