भरत साकारणार ‘मोरूची मावशी’

December 30, 2013 7:45 PM0 commentsViews: 669

30 डिसेंबर : आचार्य अत्रेंच्या मोरूची मावशी या नाटकानं मराठी रंगभूमी गाजवली होती. अभिनेते विजय चव्हाण यांनी मावशीची भूमिका अजरामर केली होती. मात्र त्यानंतर हे नाटक परत रंगभूमीवर येणार का आणि आलं तर त्यात मावशी कोण असणार याविषयी उत्सुकता होती. पण आता ही उत्सुकता संपलीय. सुयोग नाट्यसंस्था पुन्हा एकदा मोरूची मावशी हे नाटक रंगभूमीवर आणतंय. आणि या इरसाल मावशीच्या भूमिकेत आहे सुपरस्टार भरत जाधव…सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून 26 जानेवारीला हे नाटक रंगभूमीवर येतंय. या नाटकाचं दिग्दर्शन मंगेश कदम करत आहे. आयबीएन लोकमतशी खास बातचित करताना सुपरस्टार भरत जाधवनं IBN लोकमतनं हे गुपित फोडलं.

close