आम्हाला बळीचा बकरा बनवू नका,अधिकार्‍यांचं पत्र

December 30, 2013 7:30 PM0 commentsViews: 787

aadarsh notise30 डिसेंबर :  आम्हाला न्याय द्या, बळीचा बकरा बनवू नका अशी मागणी आजी-माजी सनदी अधिकार्‍यांनी मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांना कायदेशीर नोटीस तर काही अधिकार्‍यांनी पत्र पाठवली आहे.

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशी अहवालात मुंबईतल्या एकूण 12 आजी-माजी अधिकार्‍यांवर कर्तव्यात कसूर ठेवल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. यातल्या काही अधिकार्‍यांनी सहारिया यांना नोटीस पाठवली आहे. आयोगानं आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी पुरेशी संधीही दिली नाही, अशी तक्रारही त्यांनी केलीय. यानिमित्ताने आयएएस लॉबीने राज्य सरकारच्या विरोधात एक प्रकारे दंड थोपटले आहेत, असंच म्हणावं लागेल.

आयबीएन लोकमतच्या हाती माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्रधान सचिव पी. एस. संगीतराव यांची नोटीस लागलीय. संगीतराव यांनी ही नोटीस गेल्या 27 डिसेंबरला मुख्य सचिवांना पाठवलीय. त्यामध्ये आयोगाने आपल्याला कधीही आपल्याला सुनावणीसाठी बोलावलं नाही किंवा कागदपत्रं सादर करायला सांगितली नाही. तरीसुद्ध आपण दोषी कसे, असा प्रश्न संगीतराव यांनी राज्य सरकारला विचारलाय.


या अधिकार्‍यांनी पाठवल्या नोटिसा

– डी.के शंकरन
– टी.सी. बेंझामिन
– प्रदीप व्यास
– जयराज फाटक
– रामानंद तिवारी
– सी.एस. संगितराव
– आय.झेड कुंदन

close