डर्बन टेस्टमध्ये भारताचा धुव्वा, द.आफ्रिकेनं मालिका जिंकली

December 30, 2013 8:41 PM0 commentsViews: 328

durban test 201330 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमनं आपल्या लाडक्या जॅक कॅलिसला विजयी निरोप दिला आहे. डर्बनमध्ये झालेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं दहा विकेट राखून भारताला पराभूत केलं आणि दोन टेस्टची सिरीज 1-0नं जिंकली.

आज पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतानं 2 बाद 68 वरून पुढे खेळायला सुरुवात केली. तेव्हा भारत दक्षिण आफ्रिकेपेक्षा 98 रन्सने मागे होता. अजिंक्य रहाणे वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला लौकिकाला साजेशी बॅटिंग करता आली नाही आणि संपूर्ण टीम 223 मध्ये आऊट झाली.

तेव्हा दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी फक्त 58 रन्स आवश्यक होत्या. या रन्स त्यांनी एकही बॅट्समन आऊट न होता केल्या. पहिल्या इनिंगमध्ये भारतानं ऑल आऊट 334 रन्स केल्या, त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेनं ऑल आउट 500 रन्स केल्या. निवृत्तीची घोषणा केलेल्या जॅक.कॅलिसच्या 115 रन्स या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं.

close