मुख्यमंत्र्यांनी घेतली सोनियांची भेट

February 18, 2009 2:34 PM0 commentsViews: 3

18 फेब्रुवारी दिल्लीमुख्यमंत्री अशोक चव्हाण मंगळवार सकाळपासून दिल्लीत तळ ठोकून होते. राणेंचं पुनर्वसन आणि राष्ट्रवादीशी जागावाटप याविषयी त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री काल राज्य काँग्रेसचे प्रभारी ए.के. अँटोनी यांना दोन वेळा भेटले. आज त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि नारायण राणे यांच्या भेटी घेतल्या. मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं अशी नारायण राणेंची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली असताना राणेंसारख्या जहाल नेत्याचं लवकरात लवकर पुनर्वसन करणं काँग्रेससाठी गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचं समजतं. दरम्यान नारायण राणे अजूनही दिल्लीतच आहेत.

close