नगर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप

December 30, 2013 9:00 PM0 commentsViews: 757

ahamad nagar news30 डिसेंबर : अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांचा पराभव केला. काँग्रेसच्या सुवर्णा कोलते उपमहापौरपदी निवडून आल्यात.

आज झालेल्या महापौरपदासाठीच्या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब वाकळे हेही रिंगणात होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सर्वाधिक 34 जागा होत्या. तर मनसेनंही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. सुवर्णा कोलते या भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी आहे, तर जगताप हे जावई आहेत.

आघाडीच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्यानं संग्राम जगताप यांचा विजय निश्चित होता. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि अपक्ष असा 34 जणांचा गट राष्ट्रवादीनं स्थापन केलाय. मनसेनंही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपदी सुवर्णा कोलते यांचा मार्ग सुकर झाला.

अहमदनगर महापालिकेत पक्षीय बलाबल

  • राष्ट्रवादी – 18
  • काँग्रेस – 11
  • शिवसेना – 17
  • भाजप – 9
  • मनसे – 4
  • अपक्ष – 9 अपक्षांपैकी
  • एकूण 68 जागा
close