जस्टीस गांगुलींची हकालपट्टी अटळ

December 31, 2013 9:30 AM0 commentsViews: 151

ganguly360x27031 डिसेंबर: एका इंटर्न मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी जस्टीस गांगुलींच्या हकालपट्टीला केंद्र सरकारनं संमती दिली आहे. जस्टीस गांगुली सध्या पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाने कॅबिनेटसमोर ठेवलेल्या गांगुली यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावला गुरूवारी मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोप असलेले सुप्रीम कोर्टातले माजी न्यायाधीश ए.के.गांगुलींची पश्चिम बंगाल मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे आशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने केली होती. गांगुली यांच्यावर एका इंटर्न मुलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतल आहे.

close