‘थर्टी फस्ट’ला पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार

December 31, 2013 12:45 PM0 commentsViews: 482

NewYearsEveParty31 डिसेंबर : थर्टी फस्टला पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतही आता नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत पार्टी चालणार आहे. मात्र, पोलिसांसोबतच याचिकाकर्त्यांनी त्यांच्याकडे पार्टीसाठी येणार्‍या लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

न्यू इयर पार्टीचं बुकिंग तसंच पार्टीच्या तिकीट विक्रीला महिनाभर आधीपासूनच सुरुवात झाली होती. मुंबई पोलिसांनी काल घातलेल्या दीड वाजेपर्यंतच्या अटीमुळे हॉटेल व्यावसायिकांना जवळपास 500 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर ‘आहार’ संघटनेनं पोलिसांच्या आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होत. आज या याचिकेवर सुनावणी करत, मुंबईच्या थोड्याफार राहिलेल्या नाईट लाईफवर गदा आणण्याचं काहीच कारण नाही असं कोर्टाने म्हटले आहे.

 

close