LICच्या 34 पॉलिसी बंद

December 31, 2013 3:49 PM0 commentsViews: 4868

31 डिसेंबर : भारतीय जीवन विमा अर्थात एलआयसीच्या 34 पॉलिसी आजपासून बंद होणार आहेत. सरकारच्या नियामक गाईडलाइन्समुळे एलआयसीने हा निर्णय घेतलाय. बंद होणार्‍या पॉलिसींमध्ये जीवन सरल, जीवन आनंद आणि जीवन मधुर यांचा समावेश आहे. या अगोदर ज्यांनी या पॉलिसी आधीच घेतल्या आहेत त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण यापुढे या पॉलिसी कुणालाही घेता येणार नाही.

close