मार्टिन ल्युथर किंग तिसरे भारत भेटीवर

February 18, 2009 11:51 AM0 commentsViews: 81

18 फेब्रुवारी मुंबईअमेरिकेतील सिव्हिल राईटस चळवळीचे आद्यजनक होते मार्टिन ल्युथर किंग. 1959 साली मार्टिन ल्युथर किंग भारत भेटीवर आले. भारत भेटी दरम्यान ते गाधींजींच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यांच्या भारत भेटीला आता 50 वर्षे पूर्ण झाली. किंग यांची ती ऐतिहासिक भेट अमेरिकन कॉन्सुलेट 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान साजरी करतंय. त्यानिमित्त मार्टिन ल्युथर किंग यांचा मुलगा मार्टिन ल्युथर किंग तिसरे, जॉर्जियाचे रेप्रिझेन्टटिव्ह जॉन लुईस आणि अलाबामाचे प्रतिनिधी स्पेन्सर्स स्टिफन 21 जणांच्या शिष्टमंडळाबरोबर भारत भेटीवर आले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं या शिष्टमंडळाने 26 नोव्हेंबरला अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. जॉर्जियाचे रेप्रिझेन्टटिव्ह आणि अहिंसेचे पुरस्कर्ते असलेल्या जॉन लुईस यांना अमेरिकन सिनेटचा मॉरल कॉन्शस म्हटलं जातं. विद्यार्थी चळवळीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. वंशवाद आणि दहशतवादाचा बिमोड अहिंसेच्याच मार्गाने होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय.या शिष्टमंडळाने नंतर वात्सल्य ट्रस्टच्या शेल्टरची भेट घेतली.

close